पायरेट ढेकूण किंवा फुलातील ढेकूण

पायरेट ढेकूण किंवा फुलातील ढेकूण

फुलकिडे, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, कोळी, किडींची अंडी, लहान अळया इत्यादी किडीवर उपजिविका करतात.

जगात 'व्हाइट गोल्ड'चा सर्वाधिक साठा कुणाकडे ? ज्या देशाकडे जास्त लिथियम तो ठरणार 'राजा'

जगात 'व्हाइट गोल्ड'चा सर्वाधिक साठा कुणाकडे ?
ज्या देशाकडे जास्त लिथियम तो ठरणार 'राजा'

जम्मू -काश्मीरपाठोपाठ राजस्थानातही लिथियमचा आढळलेला मोठा साठा खूप मोठ जमेची बाजू आहे. कारण यामुळे इलेक्ट्रिक वाहने तसेच लॅपटॉप आणि मोबाइलसाठी लागणाऱ्या चार्जेबल बॅटरीसाठी लागणाऱ्या लिथियमची देशाची गरज भागणार आहे. यासाठी इतर देशांवर फारसे अवलंबून राहावे लागणार नाही.

सर्वाधिक साठा कुठे?
२१ बोलिविया
२० अर्जेंटिना
१२ अमेरिका
११ चिली
६.८ चीन
७.९ ऑस्ट्रेलिया
३.२ जर्मनी
२.९ कॅनडा
१.७ मेक्सिको
(आकडे दशलक्ष टनमध्ये)

भारताकडे लिथियम किती?

फेब्रुवारीत जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात लिथियमचा ५.९ मिलियन टन इतका साठा आढळला होता. भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाच्या दाव्यानुसार राजस्थानमधील साठा जम्मू-काश्मीरमध्ये आढळलेल्या साठ्यापेक्षा मोठा आहे.


उत्पादन खर्च कमी, चालतात दीर्घकाळ बाजारात लिथियम-आयर्न, सॉलिड स्टेट, निकेल मेटल हाइड्राइट, लैड-अॅसिड,
अल्ट्राकॅपेसिटर, आदी प्रकारच्या रिचार्जेबल बॅटरी मिळतात. यातील लिथियम- आयर्न बॅटरी सर्वात चांगल्या मानल्या जातात, कारण यांची ऊर्जा साठविण्याची क्षमता जास्त आहे. उच्च तापमानातही या चांगल्या प्रकारे काम करू शकतात. या बॅटरींच्या उत्पादनावर कमी खर्च येतो, तसेच या दीर्घकाळ चालतात.

इतके महाग का?

१) हा धातू साध्या चाकूने कापता यावे इतका नरम, तर तो पाण्यातही तरंगू शकतो इतका हलका असतो.

२) रासायनिक ऊर्जा साठवून | तिचे विजेत रूपांतर करू शकतो. म्हणूनच तो चार्जेबल बॅटरीमध्ये वापरला जातो.

३) ११ टन लिथियमची किंमत ३ ५७.३६ लाख रुपये इतकी आहे. यामुळे ज्या देशाकडील लिथियमचा साठा अधिक, त्याला भविष्यात मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे.

मे महिन्यात करावयाची शेतीची कामे

मे महिन्यातील शेतीची करावयाची कामे 

• खरीप हंगामासाठी पुर्वमशागतीची
कामे पूर्ण करावीत.

• उन्हाळी भुईमुग व सूर्यफुलाची वेळेवर काढणी करावी. 

• खरीप हंगामासाठी बियाणे, खते, कीटकनाशके पेरणीपूर्व वेळेवर मिळण्याची तरतूद करावी.

 • ऊसावरील खोडकिडीचा बंदोबस्त करावा.

• बोरीची छाटणी एप्रिलमध्ये केली नसल्यास मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करावी.

• उन्हाळी पिकास पाण्याच्या पाळ्या एक आठवड्याच्या अंतराने द्याव्यात.

• जूनमध्ये कोरडवाहू मिरचीची लागवड करण्यासाठी (गादी वाफ्यावर) रोपे तयार करावीत. हळद व अद्रक या पिकाची लागवड करावी. हळद व अद्रक या पिकाची लागवड करावी.

• जमिनीचा मगदूर व हवामान विचारात घेऊन आडसाली, पूर्वहंगामी व सुरू ऊसास पाणी द्यावे. पाण्याची कमतरता असल्यास आच्छादनाचा वापर करावा तसेच एक सरी आड पाणी द्यावे.

• माती परीक्षणासाठी मातीचे शास्त्रशुध्द पध्दतीने नमुने घेऊन ते मृद रसायन

प्रयोगशाळेत पाठवावेत. पावसाळ्यात फळझाडे लावण्यासाठी
खड्डे खोदावेत.

• हिरवळीच्या खतासाठी ताग पेरावा.

• मुरघासाचे खड्डे स्वच्छ करुन घ्यावेत.

• लिंबु वर्गीय फळबागेत जमीनिच्या मगदुराप्रमाणे ३० ते ५५ दिवसाचा ताण सुरू करावा.

 • झाडांना बोर्डोपेस्ट पावसाळ्यापूर्वी लावावे.

पायरेट ढेकूण किंवा फुलातील ढेकूण

पायरेट ढेकूण किंवा फुलातील ढेकूण फुलकिडे, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, कोळी, किडींची अंडी, लहान अळया इत्यादी किडीवर उपजिविका करतात.