लागवड:-
- कांद्यांची रोपे, गादी वाफे तयार करणा-या क्षेत्रााची खोल नांगरट करून कुळवाच्या दोन तीन पाळया देऊन जमिन भुसभुशित करावी.
- गादी वाफा 1 मी रूंद 3 मी लांब 15 सेमी उंच करावा.
- वाफयातील ढेकळे निवडून बाजूला काढावीत. वाफयाच्या रूंदीशी समांतर अशा 5 सेमी बोटाने रेषा पाडाव्यात. आणि यात बी ओळीत पातळ पेरावे व नंतर मातीने झाकून टाकावे.
- बी उगवून येईपर्यंत झारीने पाणी घालावे.
- बी उगवल्यानंतर गरजेप्रमाणे पाटाने पाणी द्यावे.
- फुलकिडे व करपा यांच्या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात 15 मिली मोनोक्रोटोफॉस व 25 ग्रॅम डायथेनएम 45 तसेच 50 ग्रॅम युरीया व 10 मिली सॅडोवीट यासारखी चिकट द्रव्ये मिसळून दर 10 दिवसांच्या अंतराने 4 ते 5 फवारण्या कराव्यात.
- रोपांना हरब-यासाठी गाठ तयार झाली की रोप लागवडीस योग्य समजावे.
- खरीप कांदयाची रोपे 6 ते 7 आठवडयांनी व रब्बीची 8 ते 9 आठवडयांनी तयार होतात.
- रोपे काढण्यापूर्वी 24 तास अगोदर गादी वाफयास पुरेसे पाणी द्यावे.
- कांदयाची लागवड गादी वाफयावर तसेच सरी वरंब्यावर करता येते.
- सपाट वाफयामध्ये हेक्टरी रोपांचे प्रमाण जास्त असले तरी मध्यम आकाराचे एकसारखे कांद्याचे उत्पादन मिळते.
- सपाट वाफा दोन मीटर रूंद व उताराप्रमाणे वाफयांची लांबी ठेवावी.
- रोपांची लागवड सकाळी अथवा संध्याकाळी करावी.
- रोपांची लागवड 12.5 बाय 7.5 सेमी अंतरावर करावी