मे महिन्यातील शेतीची करावयाची कामे
• खरीप हंगामासाठी पुर्वमशागतीची
कामे पूर्ण करावीत.
• उन्हाळी भुईमुग व सूर्यफुलाची वेळेवर काढणी करावी.
• खरीप हंगामासाठी बियाणे, खते, कीटकनाशके पेरणीपूर्व वेळेवर मिळण्याची तरतूद करावी.
• ऊसावरील खोडकिडीचा बंदोबस्त करावा.
• बोरीची छाटणी एप्रिलमध्ये केली नसल्यास मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करावी.
• उन्हाळी पिकास पाण्याच्या पाळ्या एक आठवड्याच्या अंतराने द्याव्यात.
• जूनमध्ये कोरडवाहू मिरचीची लागवड करण्यासाठी (गादी वाफ्यावर) रोपे तयार करावीत. हळद व अद्रक या पिकाची लागवड करावी. हळद व अद्रक या पिकाची लागवड करावी.
• जमिनीचा मगदूर व हवामान विचारात घेऊन आडसाली, पूर्वहंगामी व सुरू ऊसास पाणी द्यावे. पाण्याची कमतरता असल्यास आच्छादनाचा वापर करावा तसेच एक सरी आड पाणी द्यावे.
• माती परीक्षणासाठी मातीचे शास्त्रशुध्द पध्दतीने नमुने घेऊन ते मृद रसायन
प्रयोगशाळेत पाठवावेत. पावसाळ्यात फळझाडे लावण्यासाठी
खड्डे खोदावेत.
• हिरवळीच्या खतासाठी ताग पेरावा.
• मुरघासाचे खड्डे स्वच्छ करुन घ्यावेत.
• लिंबु वर्गीय फळबागेत जमीनिच्या मगदुराप्रमाणे ३० ते ५५ दिवसाचा ताण सुरू करावा.
• झाडांना बोर्डोपेस्ट पावसाळ्यापूर्वी लावावे.
No comments:
Post a Comment