विविध फळ पिकांचे लागवड तंत्रज्ञान

आंबा लागवड || Mango Cultivation


    पावसाळा सुरू होण्यापूर्वी एप्रिल-मे महिन्यांत आंबा लागवड करताना 10 x 10 मीटर अंतरावर 1 x 1 x 1 मीटर आकाराचे खड्डे खणून ते चांगली माती आणि तीन घमेली शेणखत आणि दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट याच्या मिश्रणाने भरून ठेवावेत. आंब्याच्या हापूस, केसर, रत्ना, सुवर्णा, साईसुगंध या जाती लागवडीसाठी निवडाव्यात. पावसाळा सुरू होताच चांगल्या जातीची कलमे सरकारमान्य किंवा शासकीय, कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिकेतून आणून लागवड पूर्ण करावी. लागवड करताना कलमांची पिशवी अलगद कापून, मातीच्या हुंडीसह खड्ड्याच्या मध्यभागी लावावे. लागवड करताना कलमांचा जोड जमिनीवर राहील याची काळजी घ्यावी. कलमांना काठीचा आधार द्यावा. हापूस जातीची लागवड करायची असल्यास परागीकरण व उत्पादनाच्या वाढीसाठी 10 ते 15 टक्के झाडे केसर, रत्ना, सिंधू किंवा गोवामानकूर या जातीची कलमे बागेत लावावीत.

No comments:

Post a Comment

पायरेट ढेकूण किंवा फुलातील ढेकूण

पायरेट ढेकूण किंवा फुलातील ढेकूण फुलकिडे, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, कोळी, किडींची अंडी, लहान अळया इत्यादी किडीवर उपजिविका करतात.