विविध फळ पिकांचे लागवड तंत्रज्ञान

आंबा लागवड || Mango Cultivation

    पावसाळा सुरू होण्यापूर्वी एप्रिल-मे महिन्यांत आंबा लागवड करताना 10 x 10 मीटर अंतरावर 1 x 1 x 1 मीटर आकाराचे खड्डे खणून ते चांगली माती आणि तीन घमेली शेणखत आणि दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट याच्या मिश्रणाने भरून ठेवावेत. आंब्याच्या हापूस, केसर, रत्ना, सुवर्णा, साईसुगंध या जाती लागवडीसाठी निवडाव्यात. पावसाळा सुरू होताच चांगल्या जातीची कलमे सरकारमान्य किंवा शासकीय, कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिकेतून आणून लागवड पूर्ण करावी. लागवड करताना कलमांची पिशवी अलगद कापून, मातीच्या हुंडीसह खड्ड्याच्या मध्यभागी लावावे. लागवड करताना कलमांचा जोड जमिनीवर राहील याची काळजी घ्यावी. कलमांना काठीचा आधार द्यावा. हापूस जातीची लागवड करायची असल्यास परागीकरण व उत्पादनाच्या वाढीसाठी 10 ते 15 टक्के झाडे केसर, रत्ना, सिंधू किंवा गोवामानकूर या जातीची कलमे बागेत लावावीत.

आंबा लागवड Mango Cultivation

लागवड:

कांदा लागवड Cultivation of onion

लागवड:-

  • कांद्यांची रोपे, गादी वाफे तयार करणा-या क्षेत्रााची खोल नांगरट करून कुळवाच्‍या दोन तीन पाळया देऊन जमिन भुसभुशित करावी.
  • गादी वाफा 1 मी रूंद 3 मी लांब 15 सेमी उंच करावा.
  • वाफयातील ढेकळे निवडून बाजूला काढावीत. वाफयाच्‍या रूंदीशी समांतर अशा 5 सेमी बोटाने रेषा पाडाव्‍यात. आणि यात बी ओळीत पातळ पेरावे व नंतर मातीने झाकून टाकावे.
  • बी उगवून येईपर्यंत झारीने पाणी घालावे.
  • बी उगवल्‍यानंतर गरजेप्रमाणे पाटाने पाणी द्यावे.
  • फुलकिडे व करपा यांच्‍या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्‍यात 15 मिली मोनोक्रोटोफॉस व 25 ग्रॅम डायथेनएम 45 तसेच 50 ग्रॅम युरीया व 10 मिली सॅडोवीट यासारखी चिकट द्रव्‍ये मिसळून दर 10 दिवसांच्‍या अंतराने 4 ते 5 फवारण्‍या कराव्‍यात.
  • रोपांना हरब-यासाठी गाठ तयार झाली की रोप लागवडीस योग्‍य समजावे.
  • खरीप कांदयाची रोपे 6 ते 7 आठवडयांनी व रब्‍बीची 8 ते 9 आठवडयांनी तयार होतात.
  • रोपे काढण्‍यापूर्वी 24 तास अगोदर गादी वाफयास पुरेसे पाणी द्यावे.
  • कांदयाची लागवड गादी वाफयावर तसेच सरी वरंब्‍यावर करता येते.
  • सपाट वाफयामध्‍ये हेक्‍टरी रोपांचे प्रमाण जास्‍त असले तरी मध्‍यम आकाराचे एकसारखे कांद्याचे उत्‍पादन मिळते.
  • सपाट वाफा दोन मीटर रूंद व उताराप्रमाणे वाफयांची लांबी ठेवावी.
  • रोपांची लागवड सकाळी अथवा संध्‍याकाळी करावी.
  • रोपांची लागवड 12.5 बाय 7.5 सेमी अंतरावर करावी

ऊस लागवड Cultivation of Sugarcane

लागवड

  • लागवडीसाठी मळ्यातील बेणे लागवडीसाठी वापरावे. तीन ते चार वर्षांनी बेणे बदलावे. उसाची लागवड एक डोळा किंवा दोन डोळ्यांची टिपरी वापरून करावी. 
  • आडसाली उसाची लागवड एक डोळा पद्धतीने करावयाची असल्यास दोन डोळ्यातील अंतर ३० सें.मी. ठेवावे. शक्‍यतो कोरड्या पद्धतीने लागण करावी. डोळा वरच्या बाजूस ठेवून हलकेसे पाणी द्यावे. 
  • दोन डोळ्यांची टिपरी वापरताना, दोन टिपरीमधील अंतर १५ ते ३० सें.मी. ठेवावे. ओल्या पद्धतीने लागण चालेल. मात्र टिपरी खोल दाबली जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी. लागणीसाठी हेक्‍टरी एक डोळ्याची ३०,००० तर दोन डोळ्यांची २५,००० टिपरी लागतील. 
  • एकडोळा पद्धतीने तयार केलेल्या रोपांची लागवड करताना, ४ फूट अंतरावर सऱ्या काढून दोन रोपांमधील अंतर २ फूट ठेवावे. या पद्धतीने हेक्‍टरी १३.५ ते १४ हजार रोपे लागतील.
  • पायरेट ढेकूण किंवा फुलातील ढेकूण

    पायरेट ढेकूण किंवा फुलातील ढेकूण फुलकिडे, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, कोळी, किडींची अंडी, लहान अळया इत्यादी किडीवर उपजिविका करतात.